धुळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यपाल कोश्यारींचा काळे झेंडे दाखवत निषेध.
अझहर पठाण
धुळे : राज्यपाल भाजपचे काम करीत आहेत, त्यांना भाजपच्या कार्यक्रमांमध्ये जायला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही असे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकर्त्यांनी धुळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाहनाच्या ताफ्याला काळे झंडे दाखवून निषेध केला.
राज्यपालांच्या नियोजित धुळे शहर दौऱ्यात निषेध नोंदविण्यासाठी काळे झंडे दाखवण्यात येईल असे राष्टवादी काँग्रेस पक्षाने आधीच जाहीर केले होते, सकाळीच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. मात्र काही कार्यकर्त्यांनी संधी साधत राज्यपाल धुळे महापालिकेच्या कार्यक्रमातून विश्राम गृहाकडे परतत असताना राज्यपालांना काळे झंडे दाखवले. पोलिसांनी काही क्षणात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले






