Maharashtra

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्य कोष्यध्यक्ष तथा भीम आर्मी भारत एकता मिशनचे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्य कोष्यध्यक्ष तथा भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कडे ई-मेल द्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात केली मागणी

शेत मजूर व रोजनदारी वर काम करणाऱ्या मजुरांना तत्काळ दहा हजार रुपयांची मदत करा

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे
सध्या देशभरात लॉकडाऊन चा चौथा टप्पा पार करण्यात आला असून
शासनाने जनतेला घालून दिलेले बंधन जनतेनेही तितक्याच काटेकोरपणे पाळण्यात आले
खरे पण या दोन महिन्यांच्या कालावधी मध्ये देशातील छोटे मोठे उद्योग कारखाने तसेच शेतीतील कामे सध्या बंद असल्याने कामगारांना काम नसले मुळे पोट भरायचे कसे हा कामगाराच्या पुढे मोठा प्रश्न उभा आहे
सरकारनं गरीब कुटूंब कल्याण या योजनेतून प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ दिले आहे पण तेच तांदूळ खायचे कश्याबरा हा ही प्रश्न कामगारांना पडलेला आहे तरी सरकारने गरीबाच्या भावनेशी खेळू नये
श्रीमंतांना लॉकडाऊन असल्याने काही फरक पडत नाही त्यांचे कडे पैसे पाणी भरपूर आहे अन्नधान्याचा साठा भरपूर आहे म्हणून श्रीमंतांना या लोकडाऊन चा परिणाम झाल्याचे दिसून येत नाहीत
म्हणून गरिबांना लॉकडाऊन मूळे मोठया समस्याला तोंड दयावे लागत आहे म्हणून रोजनदारी व हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे शेत मजुरांचे खूप हाल होत आहेत म्हणून या कामगारांना लॉकडाऊन जो पर्यंत संपणार नाही व परस्थिती सुरळीतपणे होणार नाही तोपर्यंत प्रत्येकी दहा हजाराची शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी
लक्ष्मण कांबळे यांनी मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल वर पाठवलेल्या निवेदनात मागणी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button