Pandharpur

दलित महासंघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अमोल खिलारे यांची निवड

दलित महासंघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अमोल खिलारे यांची निवड

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे
तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. पुष्पलता सकटे मॅडम यांच्या उपस्थितीत
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील अमोल खिलारे यांची दलित महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमोल खिल्लारे यांनी संघटनात्मक बांधणी करून व संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात कायम पुढाकार घेऊन जनसामान्यांना त्यांच्या न्याय व हक्कापासून कोणीही रोखू नये यासाठी सदैव प्रयत्न केले आहेत, तसेच लॉकडाऊन च्या काळात गरजू गोरगरीब मुला-मुलींना तसेच गरजू कुटुंबांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
त्यामुळे अमोल खिलारे यांच्या कार्याची दखल घेऊन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या उपस्थितीत पंढरपूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.यावेळी मारुती नाईकनवरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button