शिव अल्पसंख्यांक सेना तालुका अध्यक्ष पदी निवड वसीम शेख यांची
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : शिव अल्पसंख्यांक सेना पंढरपूर तालूका अध्यक्षपदी वसिम जमाल शेख यांची नियूक्ती करण्यात आली. ह्या प्रसंगी शिव अल्पसंख्यांक सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष जफर हिप्परगी सर यांनी वशिम शेख यांना नियूक्ती पत्र देवुन त्यांना पूढील कारकीर्दीचे शुभेच्छा ही दिल्या. तसेच शिव अल्पसंख्यांक सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष जफर हिप्परगी यांना पंढरपूर येथे शैलीचा फेटा बांधून नूतन अध्यक्ष वशिम शेख यांनी त्यांचा सत्कार ही करण्यात आले. अनेक राजकीय पक्ष अल्पसंख्यांक समाजाचा वापरच केला आहे मात्र ह्या पूढे शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतिने व आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अल्पसंख्यांक सेनेचे वरीष्ठ अधिकार्याचा मार्गदर्शनाने अल्पसंख्यांकाचा विकासा कडे लक्ष दिले जाईल. अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्न सोडवायला पूढे या असे आव्हान देखिल जिल्हा अध्यक्ष जफर हिप्परगी यांची पंढरपूर तालूका अध्यक्ष वशिम शेख यांना नियुक्ती पत्र देताना म्हणाले.
ह्या वेळी अल्पसंख्यांक समाजाचे अनेक कार्यक्रते व पदाधिकारी उपस्थित होते.






