Chopda

नागलवडी येथील रणरागिणीनीं गावात दारू बंदी साठी कंबर कसली.

नागलवडी येथील रणरागिणीनीं गावात दारू बंदी साठी कंबर कसली.

नागलवडी येथील रणरागिणीनीं गावात दारू बंदी साठी कंबर कसली.

 
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
 प्रतिनिधी तालुक्यातील नागलवाडी येथील अवैध दारू विक्री विरूद्ध गावातील महिलांनी एकत्र येऊन दारू बंदी विरूद्ध यलगर पुकारत गावातील दारू विक्री करणाऱ्याचा सहा ते सात घरात घुसून गावठी देसी दारू हस्तगत करून चोपडा पोलीस स्टेशन ला जमा करत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली

नागलवडी येथील रणरागिणीनीं गावात दारू बंदी साठी कंबर कसली.

नागलवाडी गावात अवैध दारू बंद झालीच पाहिजे अश्या घोषणा पोलीस ठाणे आवारात या महिलांनी दिल्या असुन या सर्व महिला अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून रोजंदारीने काम करणाऱ्या दिसून आल्या असून या महिलांनी थेट गावठी दारूचे भरलेले ट्यूब पकडून आणले होते.या महिलांमध्ये मीराबाई भिल,ज्योती भिल,रेखाबाई पाटील,हिरालाल भिल,आदी सह  दहा ते पंधरा महिला यावेळी उपस्थित होत्या.
याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्रकाश मथुरे याच्या फिर्यादीवरून दारू विक्री करणारे समाधान सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी संतप्त महिलांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात बसून नागलवाडी गावात दारू बंद झालीच पाहिजे,अश्या घोषणा दिल्या होत्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button