Bollywood

Bollywood: अंगावर शहारे आणणारा ‘चुप’ सिनेमाचा ट्रेलर आऊट; सनी देओल मुख्य भूमिकेत

Bollywood: अंगावर शहारे आणणारा ‘चुप’ सिनेमाचा ट्रेलर आऊट; सनी देओल मुख्य भूमिकेत तर अमिताभ बच्चन करतील हे काम..!

मुंबई: चुप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सनी देओल मुख्य भूमिकेत असणार आहे.
सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य पाहायला मिळणार आहे. आर. बल्कीने (R Balki) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘चुप’च्या ट्रेलरमध्ये सनी देओल अॅंग्री यंग मॅन अंदाजात दिसून येत आहे. या सिनेमात सनी देओलसह दुलकर सलमान, पूजा भट्ट आणि श्रेया धनवंतरीदेखील दिसून येणार आहेत. 1 मिनिट 58 सेकंदचा ‘चुप’चा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. अक्षय कुमारनेदेखील इंस्टाग्रामवर ‘चुप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत आर. बल्कीला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन हे नाव आता झळकणार ‘संगीत संयोजक’ म्हणून

‘चुप’ या सिनेमाचं कथानक आर.बल्कीने लिहिलं आहे. ‘चुप’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा सहभाग असणार आहे.
पण अभिनेता म्हणून नव्हे तर यावेळी बच्चन यांचं नाव पडद्यावर ‘संगीत संयोजक’ म्हणून झळकणार आहे. 23 सप्टेंबरला ‘चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

थरार नाट्य असलेला ‘चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट’

‘चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. आर बाल्किने या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button