Faijpur

एक वर्षाच्या मुलिला घरी ठेवून फैजपुर येथील परिचारीका यांचे जळगांव-जामोद येथे कोरोना विरुद्ध लढाईमध्ये महत्वपूर्ण योगदान

एक वर्षाच्या मुलिला घरी ठेवून फैजपुर येथील परिचारीका यांचे जळगांव-जामोद येथे कोरोना विरुद्ध लढाईमध्ये महत्वपूर्ण योगदान

सलीम पिंजारी

कोरोना या विषाणू चा नायनाट करण्यासाठी जग झटत आहे आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा देश सेवेला प्रथम प्राधान्य देत ‘जळगाव जामोद ‘येथील सामान्य रुग्णालयातील परिचारिका व फैजपूर येथील प्रा.सचिन भिडे.(कोरिओग्राफर)यांच्या पत्नी सौ. दिपाली सचिन भिडे या आपल्या एक वर्षाच्या( कु.प्रिन्सिंका)या मुलीला घरी ठेवून आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा देश सेवेला प्रथम प्राधान्य देत अहोरात्र 24 तास रूग्णालयात रुग्णांची सेवा करीत आहेत. संपूर्ण जगात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशात लाँकडाऊन लागू करण्यात आले त्यामुळे पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी वाढली कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अहोरात्र उपचार करणे ,आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आपल्या आरोग्याची काळजी न घेता अहोरात्र झटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.सोशल डिस्टन्स पाळले जात आहे.कोरोनाबाधित रुग्णावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे .यामुळे डॉक्टर परिचारिका,व दवाखान्यातील इतर कर्मचारी यांना तर तारेवरची कसरत करावी लागते .आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची पर्वा करता सौ दिपाली सचिन भिडे या आपल्या तान्ह्या चिमुरडीला घरी ठेवून कर्तव्यासाठी हजर राहत आहेत. कोणतेही कारण न देता कर्तव्य बजावण्याची तयारी ही नारी शक्तीला एक प्रेरणा देणारी बाब आहे याबाबत सौ दिपाली भिडे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या कुठल्याही बालकाला त्याच्या आईची गरज असते मात्र मी वैयक्तिक कारण देऊन देशावर आलेले संकट काढू शकत नाही देशाचा मी एक भाग आहे म्हणून कुठलेही ही कामात कसूर न करता देशसेवा करत आहे.तसेच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणे खरच खूप किती कठीण असते.खरच या मातेला सलाम करायला हवा ।।

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button