पंढरीत पैशासाठी पोलीसांचा तगादा, विविध गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी, युवकाचा आत्मदहनाचा इशारा…
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर येथे तीन महिन्यापूर्वी ए आय आर ऑफिस मधील अधिकारी व शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी तसेच एका वकिलांसोबत विदुल पांडुरंग अधटराव यांच्या घरावर धाड टाकली होती दरम्यान त्या ठिकाणी घरामध्ये पैसे व सोने सापडले होते या प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक यांनी घरातून रोख पाच लाख 30 हजार बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतले. पैकी पाच लाख पोलिसांचे वकील सागर यांच्याकडे देण्यासाठी उपनिरीक्षक जगदाळे यांनी सांगितले असा आरोपही विदुल अधटराव यांनी केला असून पोलिसांनी त्यांच्या पत्नी कडेही चार लाख रुपयाची मागणी केली दरम्यान या परिसरात घडलेल्या घटनेशी कोणताही संबंध नसताना विदल अधटराव यांना आरोपी करण्यात आले तसेच त्यांच्या मित्राकडे ही व्हाट्सअप वरून कॉल करून तुझ्या मित्राच्या प्रकरणांमध्ये सहकार्य करतो म्हणत लाचेची मागणी केल्याचे सांगितले. पोलिस अधिकाऱ्याकडून वारंवार खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात असून आपल्याकडून घेतलेल्या रकमेची मागणी करताच दमदाटी केली जाते व नाहक मानसिक त्रास , दिला जात आहे., सदर घटनेतील पोलीस अधिकारी व त्यांचे एजंट यांच्याविरुद्ध चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विशेष पोलिस महासंचालक, पोलिस महानिर्देशक, विरोधी पक्षनेते यांच्याकडे निवेदनाद्वारे विदुल पांडुरंग अधटराव यांनी केली आहे. आपणास न्याय न मिळाल्यास आपण आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.






