Maharashtra

माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी घेतली कोरोना च्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची भेट

माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी घेतली कोरोना च्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची भेट

अमळनेर :

अमळनेर येथील आज प्रांताधिकारी, तहसिलदार व आरोग्य अधिकाऱ्यां सोबत परिस्थिती बाबत चर्चा करून माननीय शिरीष दादा चौधरी यांनी आढावा घेतला तसेच आयसुलेशन रूम साठी गरज असेल तर इंदुमाई निवासस्थानाचे रूम उपलब्ध करून देण्याची स्वइच्छा मा. शिरिषदादा चौधरी यांनी व्यक्त केल्याने अधिकारी अतिशय भारावून गेले व जर गरज वाटली तर नक्की घेऊ असे उपविभागीय आधिकारी सीमा अहिरे यांनी सांगितले.

माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी घेतली कोरोना च्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची भेट

यासंदर्भाचे पत्र निवेदन स्वरूपात मा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोरोना प्रतिबंध साठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दादासाहेब श्री शिरिषदादा चौधरी यांनी दिली. प्रसंगी तहसिलदार श्री मिलिंद वाघ, बी डी ओ आरोग्य अधिकारी डॉ.गोसावी, डॉ. ताडे, डॉ. महाजन, गटनेते नगरसेवक बबली पाठक, पंकज चौधरी, किरण गोसावी, बाळासाहेब संदानशीव, अबू महाजन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button