कळंब शहर व तालुक्याचा जनता कर्फ्युला कसा आहे प्रतिसाद पहा
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण,विनाकारण फिरणारे लोक,सोशल डिस्टन्स,डबलसीट प्रवास करणे अश्या कारणामुळे रविवारी असणारा जनता कर्फ्यु उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज शनिवारी लागू करण्यात आला आहे..
कळंब शहरासह तालुक्यातील नागरिकांनी जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद देत कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेतल्याचे आज दिसून आले.
कळंब शहर व ग्रामीण भागातही जनता घरातच असल्याचे दिसून आले.
कुणीही बाहेर नाही,कळंब शहरातील सर्व प्रमुख रस्ते छत्रपती शिवाजी चौक, होळकर चौक,बस स्थानक परिसर हे एरवी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र दुपारी 1 वाजेपर्यंत कायम असल्याने प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने जोरदार समर्थन केल्याचे कळंब तालुक्यातील चित्र आहे.
तर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कळंब पोलिसांनी पथके तैनात केली असून ते सर्व भागात फिरत आहेत त्यामुळे कुठेही नागरिक घराबाहेर असल्याचे दिसत नाही ग्रामीण भागातील एकही नागरिक विनाकारण फिरकला नसून शहरासह तालुक्यातही शांतता, शुकशुकाट असल्याचे दिसून आले.






