पंढरपुरातील मुस्लीम इमाम, मौलवी ना मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर,ता.12- पंढरपूर येथील कराड नाका येथील मस्जिद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने पब्लिक नोटरी श्री यासीन शेख वकील यांच्या हस्ते पंढरपुरातील मुस्लिम इमाम आणि मैलवी या धर्मगुरुंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोना सारख्या महामारीचे संकट देश आणि राज्यावर ओढवले आहे. अशा संकटाच्या काळात गरीब, गरजू व सर्वसमान्य लोकांचे हाल सुरु आहेत. अशा लोकांना किमान दोन घास मिळावेत या माणूसकीच्या भावने पोटी गेल्या महिन्याभरापासून मनसेच्या वतीने पंढरपूर,मोहोळ, माळशिरस,माढा या तालुक्यातील गरीब,गरजूंना मदत केली जात आहे.शेतकरी, शेतमजूर, निराधार महिला,अपंग, आदीवासी, भटक्या जमातीसह परप्रातीय लोकांना ही मनसेने मदत केली आहे. आज भाषा आणि प्रातांच्या पलिकडे जावून मुस्लिम इमाम मौलवी या धर्मगुरुंना देखील त्यांच्या मज्जीदीमध्ये जावून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन समाजिक समतेचे संदेश दिला आहे.
राज्यात लाॅकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातवरचे पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडूनही गरीब लोकांना अन्न पाण्याची सोय केली जात आहे. तरीही अनेक गरीब निराधार कुुटुंबांपर्यंत अजूनही मदत पोचली नाही. अशा लोकांचे सध्या मोठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत.
संकटाच्या काळात अशा लोकांना मदत करणे ही समाजिक बांधिलकी म्हणून मसनेच्या वतीने मदत केली जात आहे. गेल्या महिना भरात जवळपास अनेक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. यापुढच्या काळात ही गरजू व गरीब कुटुंबना मदत केली जाणार असल्याचे मनेसेेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी पब्लिक नोटरी यासीन शेख,मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील. शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, शहर उपाध्यक्ष महेश पवार, सचिन सहगल, पथ्वीराज डुबल, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.






