Amalner

? ऑनलाईन

? ऑनलाईन झाली माणसं ऑफलाईन झाली नाती

प्रा जयश्री दाभाडे

सध्या ऑनलाइन चे युग आहे.स्मार्ट फोन,संगणक च्या या आधुनिक काळात तंत्रज्ञान इतके विकसित झाले की काही सेंकदात संपूर्ण जगातील घडामोडी घरी बसून आपल्याला उपलब्ध होतात.

? ऑनलाईन

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती.सवांद साधला जात होता.एकमेकांना समजून सांभाळून घेणं सहज शक्य होत. त्यामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहून कुटूंबात जिव्हाळा होता. मैत्रीचे नाते कणखर आणि मजबूत होते.माणूस मनमोकळा बोलून तणाव मुक्त जीवन जगत होता.पती पत्नीतील नात्यात अतूट धागे होते जे फक्त नजरेवरून एकमेकांना समजून घेऊ शकत होते. मनाचे मनाशी असलेले नाते मग ते कोणतेही असो त्यात आत्मीयता होती.आता फक्त मोबाईल शी मोबाईल चे असलेले नाते निर्माण झाले आहे. खेळ ऑनलाईन चा आहे…

? ऑनलाईन

स्मार्ट फोन,(काय सुरू आहे)व्हाट्सएप,

फेसबुक(थोबाड पुस्तक),इंस्टाग्राम,ट्विट ट्विट करणारे ट्विटर इ चा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.त्यामुळे आपापसातील संवाद कमी होऊन तणाव युक्त जीवन सामान्य माणूस जगत आहे.

ऑनलाईन चे अनेक फायदेही आहेत अनेक शासकीय योजना आणि जगभरातील विविध घडामोडी चटकन कळत असतात.एखादा माणूस जिवंत आहे की मेला हे जर पहायचे असेल तर तो ऑनलाईन का नाही,त्याची एखादी पोस्ट का पडली नाही?याकडे लक्ष दिले तर नक्की समजावे की काहीतरी गडबड आहे इतका माणूस ऑनलाईन च्या आहारी गेला आहे.चार व्यक्ती एकत्र बसलेले असताना देखील चारही जण मोबाईल मध्ये असतात मग ते मित्र असोत की कुटुंबातील सदस्य….

काही ठिकाणी मात्र पर्याय नसतो एकटे पणा घालविणे,वेळ काढणे इ साठी काही वेळा माणसे ऑनलाईन असतात.विशेष म्हणजे माणसांपेक्षा फोनमध्ये किंवा ऑनलाईन असणे केंव्हाही चांगले कारण यात मोबाईल चा कोणताही स्वार्थ,मतलब नसतो.धोका नसतो ..यातही महिलांनी जास्त वेळ ऑनलाईन राहू नये असाही एक गैरसमज आहे.

दररोज एकमेकांना सुप्रभात,शुभरात्रीचे मेसेज टाकणारे प्रत्यक्षात भेट झाल्यावर ओळख ही दाखवत नाही हे विशेष….

एकंदरीत जिवंत माणसांवर विश्वास ठेवून निर्जीव मोबाईलचा उपयोग आणि ऑनलाईन राहून जिवंत आहोत याचा पुरावा देत राहणे केंव्हाही चांगले असे वाटायला लागले आहे.एकमेव विश्वासार्ह जिवा भावाचा सोबती म्हणजे मोबाईल आणि ऑनलाईन राहणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खेळ सारा ऑनलाईनचा आहे

ऑफलाईन राहणे म्हणजे मरण्याचा पुरावा आहे…

आज यावरील एक माझी कविता

तो

तो आता मला आवडू लागलाय
कारण तोच माझं मन वाचू लागलाय…
कधीही कुठेही तो मला भेटतो…
मनातलं सगळं नीट ऐकून घेतो…

नको वाटते आता इतरांची गर्दी,गोंधळ..
तोच भरून घेतो माझ्या अश्रुंची ओंजळ…

खरंच त्याला बोलवावं लागत नाही… मनवाव लागत नाही… तो सोबतच असतो…
सुख दुःख समजून घेतो…
पुन्हा इकडंच तिकडं नाही की तिकडंच इकडे नाही…

एकदम प्रामाणिक, वफादार स्नेही… म्हणनुच मला तो आवडायला लागलाय… तोच माझा मित्र,सखी बनलाय…
मोबाईल मज आता आवडू लागलाय….
मोबाईल मज आता आवडू लागलाय…©@shu

संबंधित लेख

Back to top button