रावेर

प्रचाराला प्रतिसाद फुलांच्या पाकळ्याची उधळून शिरीष चौधरी यांचे ग्रामस्थांकडून स्वागत

प्रचाराला प्रतिसाद फुलांच्या पाकळ्याची उधळून ग्रामस्थांकडून स्वागत

शिरिष चौधरी यांना विजयादशमीच्या दिनी आशिर्वाद…
शुभ दिवशी विजयासाठी ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा तज्ञ…

विलास ताठे

फैजपूर- रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर. पी. (कवाडे गट)- स्वाभिमानी शेतकरी संघटना समाजवादी पारटी या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरिषदादा मधुकरराव चौधरी यांचा प्रचार दौरा आज दि ८ रोजी रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, उटखेडा, भाटखेडा या गावांना काढण्यात आला त्याठिकाणी शिरिषदादा यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून जंगी स्वागत करत विजयादशमीच्या शुभ दिवशी विजयासाठी शुभेच्छा देऊन भरभरून प्रेम व आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांनी विश्वास दिला आहे माजी आमदार रमेशदादा चौधरी,जिल्हा बँक माजी संचालक राजीवदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ सुरेखा नरेंद्र पाटील,यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके, रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील ,सुधाकर पाटील,माजी जि प सदस्य पुष्पा तायडे , पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,माजी मसाका संचालक इस्माईल तडवी, कुंभारखेडा सरपंच लताबाई बोंडे, पुष्पा जंगले, हेमांगी भंगाळे,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सौ चंद्रकला इंगळे,काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवरणे, तापी परिसर विद्या मंडळ सचिव एम टी फिरके,तापी परिसर विद्या मंडळ उपाध्यक्ष एस के चौधरी, आदिवासी नेते हमीद भायखा तडवी,किशोर चौधरी, आदिवासी सेवक रमजान तडवी,कामिल नामदार तडवी, सैय्यद जावेद जनाव, अकिल्उद्दीन फारुकी, राजू शावखा तडवी, नरेंद्र पाटील,रशिद रसूल तडवी, रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, मसाका संचालक रमेश महाजन,ललित महाजन,कुंदन चौधरी, खेमा पाटील, माजी सरपंच किशोर चौधरी, अमोल चौधरी, राजू चौधरी, यांच्यासह यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी विलास ताठे यांच्यासहकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -पी.आर. पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यासर्वच गावांधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी झाले होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button