खामसवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
सलमान मुल्ला कळंब
कळंब : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन गावच्या सरपंच सौ मनीषा कोळी व सिमा माळी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फलकाचे पूजन भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. संजय भाऊ पाटील, मा. शिवाजीराव गिड्डे ,मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोणा काळात अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्य येथिल अशा कार्यकर्त्यांनी केल्याबद्दल यांचा सत्कार सरपंच सौ.मनिषा कोळी, व सिमला सावता माळी यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी दादासाहेब कोठे पाटील,छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. शशिकांत पाटील, मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.हनुमंत पाटुळे, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस आनिता शेळके, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय रसाळ,जिल्हा परिषद सदस्य यांचे पती वैभव मुंडे, पत्रकार सुनील पाटील, पत्रकार गोपाल शेळके,एन टिव्हि न्यूज चे पत्रकार शिवाजी बोबडे, भाजपचे कार्यकर्ते अनिल शेळके, सतीश वैद्य, दिलीप गर्जे,बलराम कुलकर्णी,तसेच ग्रामस्थ विश्वास कोकणे, भीमराव कांबळे ,बाळासाहेब पाटुळे,बाबासाहेब पाटुळे, जगदिश पाटुळे,यांच्यासह अनेक ग्रामस्थ, पदाधिकारी,व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पाटुळे यांनी केले तर आभार सावता माळी यांनी मानले.






