Paranda

कु .रोहिणी नारायण माळी़ चा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

कु .रोहिणी नारायण माळी़ चा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि. १०

धाराशिव जिल्हा तालीम संघ सब जूनियर व वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा दिनांक ९ फेब्रुवारी २०२०रोजी येडशी येथे संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये ४३ किलो वजनी गटातून कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील कु .रोहिणी नारायण माळी़ या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विभागीय पातळीवर होणाऱ्या ४३ किलो वजन गटात तिची निवड झाली आहे या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार माननीय श्री. सुजितसिंहजी ठाकूर साहेब संस्थेच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी मार्गदर्शक श्री. विकास कुलकर्णी कल्याण सागर माध्यमिक विद्यालय डोमगाव चे मुख्याध्यापक श्री. सुबोधसिंह ठाकूर सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण गरड यांनी या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले .तिचे पालक श्री.नारायण माळी क्रीडा शिक्षक श्री.चंद्रकांत तनपुरे सहशिक्षक मुकुंद भोसले,महादेव नरूटे, अजित गव्हाणे, रोहित रासकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूचे परिसरातून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button