तपसे चिंचोली येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
प्रशांत नेटके
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, साहित्यिक , कवी ,विचारवंत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी सरपंच मारुती नेटके यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मल्हारी डोलारे,प्रवीण नेटके,सोहम शिंदे,ओंकार नेटके, प्रशांत नेटके ,श्रावणी सांगवीकर, प्रांजली डोलारे,समृद्धी शिंदे आदी उपस्थित होते .






