डोमगावच्या रेशन दुकान दारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सुरेश बागडे परंडा
परंडा : मोफत धान्याचे दोन्ही कोटे गोर गरीब जनतेला वाटप न करता एक कोटा हडप केल्याचा आरोप करून डोमगाव येथील रेशन दुकानदार महादेव मिस्कीन यांच्या दुकानाचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा अन्यथा तहासिल समोर उपोषण करू असा इशारा कुमार गाय्कवाड व अंकुश गायकवाड यांनी दिला आहे .
दि २८ मे रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
लॉक डाऊन च्या काळात गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणुन केंद्र सरकार व राज्य सरकार कडून मे महिण्यात मोफत धान्य पुरवठा करण्यात आले मात्र परंडा तालूक्यातील डोमगावचे रेशन दुकानदार महादेव मिस्कीन यांनी एकच कोटा वाटप करून दुसरा कोटा वाटप केला नाही असे तक्रारी अर्जात म्हटले आहे .
मिस्कीन दुकानदाराने मोफत वाटप करण्या साठी दोन्ही धान्याचे कोटे तहसिल कार्यालयातुन उचलले आहे त्या मधील एका कोटयातील धान्याचा काळाबाजार केला असल्याचे अरोप करण्यात आले आहे या युळे खळबळ उडाली आहे .
दुकानदार मीस्कीन यांना गायकवाड यांनी दुसरा कोट्यातील मोफत धान्य नागरीकांना कधी वाटप करणार असल्याचे विचारले असता मोफतचा एकच कोटा आहे असे सांगुन उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले असल्याचे अर्जात नमुद केले आहे .
तक्रारदार गायकवाड यांनी डोमगावच्या रेशन दुकानाच्या धान्य पुरवठ्याची तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागात चौकशी केली असता मोफत चे दोन्ही धान्य कोटा दुकानदार मीस्कीन यांनी उचलले असल्याची कळाले .
मीस्कीन यांच्या दुकानाची तात्काळ चौकशी करून दुकानाचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा अन्यथा तहसिल समोर उपोषण करणार असल्याचा इशारा कुमार गायकवाड व अंकुश गायकवाड यांनी दिला आहे .






