Pandharpur

कासेगाव ग्रामपंचायत उप सरपंच पदी हंसराज देशमुख यांची बिन विरोध निवड

कासेगाव ग्रामपंचायत उप सरपंच पदी हंसराज देशमुख यांची बिन विरोध निवड

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपुर तालुक्यातील कासेगाव येथील ग्रामपंचायत उप सरपंच पदा साठी झालेल्या निवडनुकीत दोन अर्ज दाखल करण्यात आले,
पहिला अर्ज पांडुरंग स सा कारखान्याचे उप अध्यक्ष व सोलापुर जिल्हा परिषद सदस्य श्री वसंतराव नाना देशमुख यांच्या गटाचे ग्रामपंचायत सदस्य हंसराज देशमुख यांचा तर दुसरा अर्ज परिचारक प्रेमी तिसरी आघाड़ी यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य हरीभाऊ फुगारे असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते,अर्ज भरण्याची वेळ सकाळी दहा ते बारा यावेळेत दोन अर्ज दाखल झाले नंतर अर्ज काढण्याची वेळ बार ते दोन यावेळेत ग्रामपंचायत सदस्य हरीभाऊ फुगारे यांनी अर्ज माघारी घेतल्याने उप सरपंच पदा साठी एक अर्ज राहिल्याने ग्रामपंचायत सदस्य हंसराज देशमुख यांची बिन विरोध उप सरपंच पदी निवड झाल्याचे निवडणुक निणॆयक अधिकारी व कासेगावच्या सरपंच उज्वला धोञे यानी घोषित केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी एस एम येलपले यांनी ही सहकार्य केले यावेळी पांडुरंग स सा कारखान्याचे उप अध्यक्ष व सोलापुर जिल्हा परिषद सदस्य श्री वसंतराव नाना देशमुख, पंचायत समिति सभापति प्रशांत देशमुख, संग्रामसिंह देशमुख, औदुम्बर निकम माजी उप सरपंच,सिंध्देश्व खिलारे,प्रकाश रुपनर,आप्पासो जाधव,प्रमोद देशमुख,दिपक जाधव,विराज देशमुख,अॅड संतोष देशमुख,गोरख सलगर, अनिल इंगोले, शिवाजी देशमुख, अनिकेत देशमुख, संजय वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कासेगाव मधील नागरिकांनी वसंत नाना देशमुख यांच्या गटाचे उप सरपंच हंसराज देशमुख यांची बिन विरोध निवड झाल्याने ग्रामस्थाच्यावतीने फटाक्याची आतिशबाजी करत गुलालाची मुक्त उधळन केली यावेळी,कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नुतन उप सरपंच हंसराज देशमुख व निवडणुक निणॆयक अधिकारी कासेगावच्या सरपंच उज्वला धोञे यांचा हि सत्कार करण्यात आला यावेळी कोणताही अनुसुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच उप सरपंच हंसराज देशमुख यांची गावातील ग्रामस्थानाच्या वतीने वाजत गाजत गावातुन मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणुकीत नुतन उप सरपंच हंसराज देशमुख याची संवॆ मान्यवर व गावातील ग्रामस्थानी हार फेटा बाधुन सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button