पंढरपुरात बडवे गल्लीतील गरजु बांधवाना मनसेची मदत
रफिक आतार
पंढरपूर, शहरांमधील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या सर्व जाती धर्माच्या आणि गरीब कुटुंबांना मसनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मदत केली आहे. आज पंढरपुरातील बडवे गल्लीत राहणाऱ्या गरीब कुटुंबाना ही त्यांनी अन्नाधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
पालिकेचे नगरसेवक शैलेश बडवे व गणेश पिंपळकर यांच्या उपस्थितीत गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
देशात आणि राज्यात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाॅकडाऊनमुळे गरीब कुटुंबाना कुठेही काम धंदा नसल्यामुळे त्यांचे हाल सुरु आहेत.पंढरपूर शहरातील ब़डवे गल्लीत ही काही गरीब कुटुंबाना मदतीची गरज होती येथील काही स्थानिक लोकांनी मदतची मागणी केली होती. त्यानुसार आज मसेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी येथील गरीब लोकांना गव्हू,तांदुळ, तेल,साखर,चहा पावडर आदी साहित्य वाटप केले. त्यानंतर गोपाळपूर येथेही काही गरीब लोकांना धान्याचे वाटप केले.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना गोरगरीब लोक संकटात आहेत. त्यांना मदत करावी असे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या आवाहनानुसार दिलीप धोत्रे हे गेल्या महिनाभरापासून दररोज धान्य देवून गोरगरीबांना मदत करत आहेत.
कार्यक्रमास मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहराध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके, सुहास देशपांडे, ऋषिकेश पुणेकर, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.






