रावेर

सावखेडा, लोहारा व चिंचाटी परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी,

सावखेडा, लोहारा व चिंचाटी परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, 

सावखेडा, लोहारा व चिंचाटी परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी,

रावेर प्रतिनिधी विलास ताठे 
गावातील धाडी नदीला मोठा पूर, पुराचे पाणी घरात घुसून ग्रामस्थांचे नुकसान
सावखेडा ता रावेर-सावखेडा ,लोहारा, चिंचाटी परिसरात दिनांक २ रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुमारे दोन ते अडीच तास सुरूच होता. परिसरात झालेल्या या मुसळधार पावसाने सावखेडा बुद्रुक व खुर्द गावाला जोडणाऱ्या धाडी नदीला मोठा पूर आलेला होता .या पुराचे पाणी एवढे प्रचंड होते कि, सावखेडा खुर्द व बुद्रुक गावामध्ये पुराचे पाणी काही ग्रामस्थांच्या घरामध्ये शिरून प्रचंड घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तसेच सावखेडा खुर्द येथे एक भले मोठे पिंपळाचे झाड लक्ष्मण किसन बखाल यांच्या घरावर पडले .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही तर घराचे नुकसान झालेले आहे. पावसाचे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतातही  साचलेले दिसून आले. परतीच्या पावसाचे पाणी शेतात प्रचंड प्रमाणात साचल्याने ज्वारी, मका , व उडीद मूग , कपाशी या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात आला आहे. तसेच सावखेडा -खिरोदा रस्त्या मधील नाल्याला ही प्रचंड पूर आलेला होता .या नाल्यांमध्ये रोझोदा येथील रहिवासी आरिफ पिंजारी  यांची होंडा शाइन मोटर सायकल पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली व आरिफ पिंजारी यांचे प्राण थोडक्यात वाचले. तसेच सावखेडा -खिरोदा रस्त्यामधील दोन्ही पुलांचे भूमिपूजन सात ते आठ महिन्यांपूर्वी झालेले असून अद्यापही या पुलांचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू झालेले नसून जर पुल तयार झालेला असता ,तर ही दुर्घटना घडली नसती ,अशी गावकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.या दोन्ही नाल्यांना पूर असल्यामुळे सावखेडा -खिरोदा रस्त्यावरील रहदारी दोन ते तीन तास ठप्प झालेली होती.
      तसेच सावखेडा बुद्रुक व खुर्द गावाला जोडणाऱ्या धाडी नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी ग्रामस्थांच्या घरांमध्ये शिरून घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून त्यात  मुबारक दगडू तडवी, सद्दाम खलील तडवी यांच्या घरांच्या भिंती पडल्या असून ब्रिजलाल चौधरी, मुसा बिस्मिल्ला तडवी, मेहमुदाबाई खलील तडवी ,बाबू टिप्सु बखाल अशोक चौधरी, राजेंद्र संपत बखाल, माणिक कडू बखाल ,अशा अनेक ग्रामस्थांचे नुकसान झालेले आहे.
        तसेच महसूल विभागाकडून खिरोदा मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल व सावखेडा तलाठी अजय महाजन यांनी नुकसानीचे पाहणी करून उद्या पंचनामे करणार असल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button