ग्रामगीता घरोघरी पोहचून सतत वाचन करण्याची आवश्यकता ..
आमदार बंटीभाऊ भांगडीया
गोंदेडा गुंफा यात्रेत गुरुदेव भक्ताचा जनसागर उसळला
चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
तपोभूमीची सेवा कितीही केली तरी ती कमीच असल्याने पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली .अनेक वर्षांपासून पुण्यतिथी साजरी करीत असली तरी ग्रामगितेचे वाचन होत नसल्याची खंत व्यक्त करीत राष्ट्रसंताची ग्रामगीता वाचन केल्यास जीवनाचा आकार बदलु शकतो . तपोभूमीचा आशीर्वाद मिळाल्याने आम्ही पिता पुत्र आमदार झालो . वर्षभर राष्ट्रसंताचे विचार आचरण करण्याचे गरज असल्याचे सांगत तपोभूमीतील अजूनही कामे अपुरे असले तरी राष्ट्रसंताचे आशीर्वाद असल्याने ती अपुरे कामे पूर्ण करण्याची ग्वाही आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली .
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सवातील गोपाल काला समारोपीय कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते .
याप्रसंगी माजी आमदार मितेशजी भांगडीया, बोथेंजी प्रकाशमहाराज वाघ ,जीप अध्यक्ष संध्या गुरनुले, जीप उपाध्यक्ष रेखा कारेकर, जीप सदस्य ममता डुकरे, माजी जीप सदस्य पंजाबराव गावंडे आदी उपस्थित होते
000 यावेळी माजी आमदार मितेशजी भांगडीया म्हणाले की नवीन भव्य दिव्य सभागृह करून देण्याची ग्वाही दिली.000
यात्रा महोत्सवातील तीन दिवस दरम्यान भजन स्पर्धा ,युवक मेळावा, महिला मेळावा, क्रीडा स्पर्धा , नेत्रदान शिबिर,श्रमदान कार्यक्रम घेण्यात आले.
संचालन भास्कर वाढई यांनी केले
यात्रा महोत्सव च्या समारोपीय कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या माध्यमातून महाप्रसाद वाटप करण्यात आले .
गुरुदेवसेवकांच्या दिंड्या पालखी सुद्धा उपस्थित होत्या.
यात्रेत चिमूर पंचक्रोशीतील गुरुदेव भक्त जनसागर उपस्थित होते.






