पंढरपूर शहरांमधील उपनगर च्या महिलेने फायनान्स कर्मचाऱ्याला दिला महाप्रसादाचा चौप
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमधील उपनगर परिसरामध्ये एका महिला बचत गटाला हप्ता व व्याज मागणीचा वारंवार तगादा लावला होता.. महिलांनी त्या मायक्रो फायनान्स च्या व बंधन बँक ग्रामीण कुटा बँक व SKS बँक च्या कर्मचार्यास कित्येक वेळा विनंती केली होती की जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे तसेच जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे सक्तीने हप्ता वसुली करू नये अन्यथा गुन्हे दाखल करूअसे आदेश असतानादेखील हा फायनान्स चा कर्मचारी वारंवार पैशाची मागणी करत असल्याने महिला संतप्त झाल्या होत्या त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप माने यांना या विषयी माहिती दिली व तेही त्या ठिकाणी आले.. संतप्त झालेल्या महिलांनी व महादेव कोळी समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्यास चोप दिला सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्या कर्मचाऱ्याने महिलांची माफी मागितली व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली..31 ऑगस्टपर्यंत हप्त्यासाठी पुन्हा येणार नाही असे आश्वासन देऊन तो कर्मचारी निघून गेला.






