चोपडा येथे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा
चोपडा प्रतिनिधी लतीश जैन
ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने
सध्या कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे तसेच शासकीय नियमांचे पालन करून थोडक्यात जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला.
दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9:00 वाजेला हरेश्वर मंदिर येथे कॅमेरा पूजन व कोरणा योद्धा सन्मानपत्र वितरण आणि फोटोग्राफर सदस्यांच्या गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षारोपण करून जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी फोटोग्राफर सदस्यांच्या परिवारातील जे सदस्य वैद्यकीय क्षेत्रात शासकीय व प्रशासकीय क्षेत्रात सेवा देणारे तसेच कोरोना काळात अन्नदान करणारे सामाजिक कार्यकर्ते असे ज्यांनी ज्यांनी सेवा दिली त्या व्यक्तींचा तसेच फोटोग्राफर सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान पत्र पुष्पगुच्छ देऊन असोसिएशनचे तालुकाप्रमुख श्री ज्ञानेश्वर भाऊ सैंदाणे, शहर प्रमुख विलास भाऊ कोष्टी ग्रामीण प्रमुख नरेंद्र भाऊ पाटील, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत भाऊ चौधरी व सन्माननीय सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व हरेश्वर मंदिर परिसरात असोसिएशनचे जेष्ठ सदस्य श्री ए पी पाटील सर, श्री संजय पाटील सर, श्री राजेंद्र भाऊ धनगर, यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
याप्रसंगी सूत्रसंचालन श्री ए पी पाटील सर यांनी केले तसेच
श्री प्रकाश भाऊ पवार, ज्ञानेश्वर भाऊ सोनगिरे, नरेंद्र भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन असोसिएशनचे प्रसिद्धीप्रमुख प्रशांत चौधरी यांनी केले.
यशस्वी कार्यक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर भाऊ सैंदाणे,
सुरेश चौधरी,विनोद जाधव, विलास भाऊ,योगेश भाऊ, शफिकभाई खोकर, वसीम तेलि यांनी परिश्रम घेतले.






