शहीद भगतसिंग वाडा भालोद येथे “सन्मान कोरोना योद्धांचा” कार्यक्रम संपन्न
यावल शब्बीर खान
तालुक्यातिल भालोद येथे नुकताच कै.गिरधर शेठ नेहेते फाऊंडेशन व एकता गणेशोत्सव शहीद भगतसिंग वाडा, भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान कोरोना योद्धांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगाव जिल्हा बँक संचालक मा.श्री गणेश दादा नेहेते तर प्रमुख पाहुणे म्हणून यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, फैजपूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश वानखडे, कृषीभुषण मा. श्री नारायण बापु चौधरी, भालोद येथील माजी सरपंच श्री अरुणदादा चौधरी, वि.का.सो. भालोद चे माजी चेअरमन मा.श्री. भास्करदादा पिंपळे व भालोद गावच्या सरपंच महोदया सौ. मिनाक्षीताई भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, फैजपुर स.पो.नी श्री प्रकाश वानखडे, गावातील सर्व डॉक्टर, मेडिकल चालक, पोलीसपाटिल, ग्राम. कार्यालय, प्रा.आरोग्य केंद्र, म.रा.वि.वि.कंपनी चे भालोद सबस्टेशन आदी कोरोना योद्धांचा कै.गिरधर शेठ नेहेते फाऊंडेशन व एकता गणेशोत्सव शहीद भगतसिंग वाडा, भालोद तर्फे सन्मानपत्र व किरण इंडस्ट्रीज जळगाव तर्फे श्रीमद्भभगवद्गीता देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र नेहेते,पितांबर इंगळे, भुषण नेहेते, शिरीष नेहेते, हेमंत परतणे, रोशन इंगळे, स्वप्निल बरडे, प्रतिक भिरुड, प्रशांत परतणे, लोकेश वारके, सेवकराम नेहेते, देवेंद्र नेहेते आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जावळे यांनी केले.संपूर्ण कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग व तोंडाला मास्क लावून पार पडला.






