ChampaNagpur

१५०व्या महात्मा गांधी जयंती निमित्त चांपा येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसह भागातून महाश्रमदानाला शुभारंभ

१५०व्या महात्मा गांधी जयंती निमित्त चांपा येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसह भागातून महाश्रमदानाला शुभारंभ
 चांपा येथे स्वच्छता ही सेवा  मोहिमेतुन २००किलो प्लास्टिक गोळा करून  १५०वी महात्मा गांधी जयंती साजरी 

१५०व्या महात्मा गांधी जयंती निमित्त चांपा येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसह भागातून महाश्रमदानाला शुभारंभ

चांपा ,प्रतिनिधी अनिल पवार
 महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती निमित्त चांपा येथे गट ग्रामपंचायतच्या  वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य  पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महा श्रमदान कार्यक्रमात  सहभाग नोंदविला.

१५०व्या महात्मा गांधी जयंती निमित्त चांपा येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसह भागातून महाश्रमदानाला शुभारंभ

पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे व सरपंच अतिश पवार यांच्यासह शासकीय  कर्मचाऱ्यांनी व गावातील नागरिकांनी भव्य लोकसहभागातून स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान करून  प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी ग्रामपंचायत कार्यालय  , आठवडी बाजार , जिल्हापरिषद शाळा , माता बाल संगोपन उपकेंद्र पासून तर संपूर्ण गावात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जनजागृती करून  मोहिमेला सुरुवात करण्यात आली.यावेळी उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे यांच्या हस्ते गांधीजीच्या प्रतिमेच पुजन करून  महात्मा गांधींच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले.व मार्गदर्शन करतेवेळी  सर्व ग्रामस्थांकडुन प्लास्टिक निर्मुलन व  तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली .श्रमदानातून गावात  स्वच्छता ही सेवाचे महत्व पटवून दिले . उमरेड तालुक्यात प्रथमच चांपा ग्रामपंचायत येथे  महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे यांच्या हस्ते सनेटरी नापकींन इण्सीनेटर मिशनचे उदघाटन करण्यात आले .यावेळी महिलांना मशीन संबंधित मार्गदर्शन केले .त्यानंतर ग्रामपंचायत व आठवडी बाजारात , हनुमान मंदीर आवारात स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयघोष करीत  स्वच्छता हीच सेवाचा मूलमंत्र सर्व गावकऱ्यांना देण्यात आला . सर्व गावात प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती रॅली काढण्यात येऊन गावात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली .
चांपा ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसहभागातून महाश्रमदानाला सुरवात करण्यात आली . यावेळी संपुर्ण चांपा गावातून २००किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले .
१५०व्या महात्मा गांधी जयंती निमित्त चांपा येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसह भागातून महाश्रमदानाला शुभारंभ करून१५०वी  महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली 
 स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे  , चांप्याचे सरपंच अतिश पवार ,  जिल्हा परिषद नागपुर पाणी व गुणवत्ता विभागाचे राजेधर साहेब ,  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एम .जी .माने , प .स शिक्षण विस्तार अधिकारी एम .पाटील , नोडल अधिकारी आर .एन .जुमळे , प .स गट  समन्वयक सुवर्णा आर पोटे , प .स पाणी व स्वच्छता मिशन कक्ष समूह समन्वयक विनोद भोष्कर ,प .स . विस्तार अधिकारी सानप ग्रा .प उपसरपंच अर्चना सिरसाम, ग्रा .प सदस्य अस्मिता अरतपायरे , मिराबाई मसराम , रेश्मा राऊत ,  सोबतच तनिष्का गट प्रमुख वैशाली वरठी, आदींसह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button