Amalner

शिरुड परिसरात घाणीचे साम्राज्य गुरांचे पिण्याचे पाण्याचे हौद झाले गडूळ

शिरुड परिसरात घाणीचे साम्राज्य
गुरांचे पिण्याचे पाण्याचे हौद झाले गडूळ

रजनीकांत पाटील अमळनेर

Amalaner : तालुक्यातील शिरूड परिसरातील नवेगाव बहिरम पार चौक समोरील असलेल्या पाळ विहीर जवळील हौद हा गुरांच्या पिणाच्या पिण्यासाठी असल्याने त्या ठिकाणी आजूबाजूला अतिशय घाणीचे साम्राज्य झाले असल्याने ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे या बाबत सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरत आहे या बाबत परिसरातील नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न उद्भवतो सध्याची परिस्थिती पाहता कोरोना सारखा महाभयंकर आजार त्यातच आपल्या आजूबाजूला असलेली घाण जनतेच्या जीवाव वर बेतू शकते या बाबत ग्रामपंचायत लक्ष देण्याची गरज आहे.
तसेच महादेव नगर परिसरातील गुरांचा पीण्याचा पाण्याचा हौद देखील हा अतिशय खराब झाल्याने त्यात येणारे स्वच्छ पाणी हे गडूळ होत असते त्याला हौद हा वेळो वेळी स्वच्छ केला जात नसल्याने त्याची दुर्गंधी येते तेथे गुरे पाणी पीत नाही तसेच काही तहानलेली गुरे ही नाईलाजाने पाणी पीत असल्याकारणाने त्याना वेगवेळ्या आजराला देखील समोर जावे लागते या बाबत देखील नागरिकांची ओरड येत आहे तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा व हौद देखील वेळी वेळी धुऊन भरावा असे नागरिकांन कडून बोलले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button