आमदार सौभाग्यवती राणी निलेश लंके यांच्या हस्ते संत बाळुमामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा जाम कौडगाव येथे संपन्न ?
सुनिल नजन/ अहमदनगर
ह.भ.प.लक्ष्मण महाराज खर्से यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते अहमदनगर तालुक्यातील जामकौडगाव येथे श्रीसंत बाळुमामा मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशरोहन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या त्रिदिवसीय कार्यक्रमात ह.भ.प.समाधान महाराज शर्मा, श्रीनिवास घुगे,आणि निव्रुत्ति देशमुख इंदोरीकर यांची किर्तने झाली. या सोहळ्यासाठी विषेश आकर्षक प्रसिद्ध गायिका सौ संगिता शिंदे यांच्या अभंग आणि गवळणी सादर करण्यात आल्या. तसेच गणेश शिंदे यांनी ग्रामीण कथा सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नतीमंडळाचे राज्य संपर्क प्रमुख अण्णासाहेब बाचकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार, अरुण मतकर,अँड अरुण बनकर, मनोज गाडे,उद्धव काळपहाड,यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर






