Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ग्रामीण जागृकता कार्यक्रम संपन्न

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ग्रामीण जागृकता कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी रफीक आत्तार

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव येथील कृषीदूत विनायक बसवेश्वर देवमारे यांच्याकडून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या गावात विविध प्रात्यक्षिक तसेच चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम सण 2020-21 अंतर्गत हे कृषीदुत कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 या रुग्णाच्या प्रादुर्भावामुळे सदर कार्यक्रम शासनाचे सर्व नियम पाळून पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव मध्ये घेण्यात आला .

यामध्ये कृषीसल्ला, चर्चासत्र, विविध पिक, प्रात्यक्षिक, सर्व जनावरांचे लसीकरण व माती परीक्षण शिबिर तसेच कृषी विषयक इतर उपक्रम राबविण्यात आले.तालुका प्रतिनिधी सा चौफेर सदर विद्यार्थी श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरि हाके , कार्यक्रम समन्वयक कार्यक्रम अधिकारी प्रा. धीरज दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम पार पडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button