Solapur

अरण केंद्रांत लर्न टू होम अंतर्गत ऑनलाइन शिक्षक विद्यार्थी शाळा

अरण केंद्रांत लर्न टू होम अंतर्गत ऑनलाइन शिक्षक विद्यार्थी शाळा

सोलापूर

राज्यात ,देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा दिनांक पंधरा-सोळा मार्च दोन हजार वीस पासून बंद आहेत. शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे. या सुट्टीच्या काळात वर्क टू होम अंतर्गत कामे करण्यास प्रोत्साहन शासनामार्फत देण्यात आलेले आहे. याकाळात लर्न टू होम अंतर्गत केंद्र अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर विलास काळे यांचे मार्गदर्शनाखाली अरण केंद्रा मधील सर्व १७ जिल्हा परिषद शाळा व ३ खाजगी माध्यमांच्या शाळांमध्ये लर्न टू होम ,स्टडी टू होम उपक्रम राबविला जात आहे.

शैक्षणिक काम व्हाट्सअॅप द्वारे सुरु करण्यात आलेले आहे. लर्न टू होम, स्टडी टू होम अंतर्गत केंद्र अरण मधील शाळातील विद्यार्थ्यांचे आई-वडील पालकांकडे स्मार्टफोन आहेत, याचा उपयोग करून स्मार्टफोन पालकांचा शाळे नुसार, शाळेतील इयत्तेनुसार व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातो. मार्चच्या पंधरवाड्यात शाळा बंद झाल्याने बराचसा पाठ्यक्रम पूर्ण झालेला होता. त्यामुळे व्हाट्सअॅप द्वारे विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातील घटक उपघटकाच्या सराव चाचण्या लिंक द्वारे, पीडीएफ फाईल द्वारे सोडविण्यास देण्यात येतात. विद्यार्थ्यांचे आई वडील घरी बसून मोबाईल द्वारे विद्यार्थ्याकडून लिंक वर व वही मध्ये अभ्यास घेतात. काही शैक्षणिक पाठ्यक्रमाचे ऑडिओ व्हिडिओद्वारे शिकणे, शिकवणे व शिक्षकांकडून आवश्यक तेवढे मार्गदर्शन केले जाते. युट्युब वरील शैक्षणिक व्हिडिओ ऑडिओ ची माहिती देऊन ते पाहण्यास मार्गदर्शन केले जाते. कोरोना विषाणू संसर्ग च्या बाबतीत योग्य आवश्यक मार्गदर्शन वेळोवेळी केले जात आहे. दिवसातून किमान ७ते८ वेळा साबणाने हात स्वच्छ धुवावेत , आवश्यक त्यावेळी घराबाहेर जाताना तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधणे , स़चारबंदीच्या काळात घराबाहेर जाऊ नये , घ्यावयाची काळजी, घरी राहणे हीच खबरदारी याविषयी माहिती दिली जात असून मार्गदर्शन केले जात आहे. आई-वडील पालकांचा विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

*लॉक डाउन च्या काळात केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांचे समन्वयातून. घरी राहून विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार सर्व विषयांचे शै मार्गदर्शन केले जाते माहिती तंत्रज्ञान साधनांचा योग्य वेळी योग्य उपयोग करून घेत आहोत निश्चितच या काळात विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक फायदा होत आहे जितके दिवस लॉक डाऊन राहील या काळामध्ये आम्ही लर्न टू होम व स्टडी टू होम हा उपक्रम चालू ठेवणार आहोत*”
*डॉक्टर विलास काळे केंद्रप्रमुख केंद्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button