Surgana

प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी निष्काळजी व अपूर्ण सुविधा मूळे सर्प दवंश झालेल्या रुग्णाचा मृत्यू

प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी निष्काळजी व अपूर्ण सुविधा मूळे सर्प दवंश झालेल्या रुग्णाचा मृत्यू

विजय कानडे

मनखेड येथे सकाळी 6.30 वाजता सर्प दवनशाने मृत्यू झाला पण ज्या वेळेस रुग्णांना प्राथमिक रुग्णालय मनखेड येते नेले त्या रुग्णावर तेथील डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार केले आणि जे उपचार केले ते काय केले या रुग्णाच्या नातेवाईक याना लगेच नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि रुग्णाचा नाशिक घेऊन जात असताना मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. डॉक्टर याना जर आरोग्य विभागा संदर्भात काही विचारले तर ते सांगतात की सुरगाणा तालुका नाव सांगितलं की कोणी अधिकारी कामास येण्यास नकार देतात असे का?सुरगाणा तालुक्यातील लोक हे माणस नाही का फक्त राब राब मजुरी साठी फक्त वापर करताना चांगले वाटते यांच्या जीवाची किंमत शून्य का?कारण ते आदिवासी भागात जन्माला आले हा दोष का?आजून पण काही अधिकारी रुजू होऊन हॉस्पिटलमध्ये कामाला येत नाही पगार काढून खातात?आजून पण खूप रिक्त पदे आहे,मानव संसाधन अंतर्गत कॅम्पस झाले पाहिजे फक्त कागदोपत्री दाखवू पैसे काडून खातात ,अंगणवाडीतील मुलांना खूप योजना येतात तरी कुपोषित बालकाचे प्रमाण तालुक्यात का जास्त?108 अंबुलन्स उभी राहते थोडीशी ना दुरुस्त असते कोणी अधिकारी काँप्लेट करत नाही एकदा रुग्ण येतो तो सिरीयस असतो तेथील डॉक्टर आपली प्राथमिक जबाबदारी पार करून लगेच नाशिक सिव्हिल पाठवता त्यावेळेस शासन जो एवढा खर्च करतो ह्या सुविधानवर तो वायफळ जातो कारण त्या पेशनट चे नातेवाईक खाजगी वाहन करून घेऊन जातात त्याचा कडे काही सुविधा नसतात पेशनटचा रस्त्यातच मरण पावतो याला जबाबदार आपण काही बोलो तर हे अधिकारी कायद्याचा धाक दाखवतात आणि गरीब जनतेची मुस्कटदाबी करतात .तर हे आता सर्व राजकीय पक्ष ,संघटना सामाजिक यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आजून किती लोकांच्या मरणाची वाट बघत आहे.

आज या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा मुळे पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू आज या सर्व हालचाली वर शिवसेना तालुका प्रमुख मोहनराव गांगुर्डे, योगेश वार्डे, आदी ग्रामस्थ विभागातील होते.तहसीलदार सूर्यवंशी साहेब. लोखंडे सर (api),बोडके सर(api),रणवीरसर(tmo)उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button