मसाका चे ऊस तोड व वाहतूक ठेकेदार यांचे उपोषण मागे
सलीम पिंजारी
गळीत हंगाम 2018-19 मधील तसेच मागील ऊस तोड व वाहतूक ठेकेदार यांचे थकीत पेमेंट मिळणे साठी दि 13.09.2019 पासून सुरू असलेले उपोषण आज दि 19.11.2019 रोजी श्री सुरेश पाटील ऊस तोडणी व वाहतूक उपसमिती चेअरमन यांनी उपोषणार्थी यांचेशी थकीत ऊस तोड व वाहतूक पेमेंट भविष्यात उपलब्धता झालेवर अदा करणेसंबधी सकारात्मक चर्चा केली त्यावर उपोषणार्थी यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आलेले आहे यावेळी मा चेअरमन श्री शरद महाजन , व्हा चेअरमन श्री भागवत पाटील , संचालक श्री नरेंद्र नारखेडे ,श्री रमेश महाजन कार्यकारी संचालक श्री एस आर पिसाळ , श्री के डी भंगाळे मुख्य शेती अधिकारी ,तसेच उपोषणार्थी श्री सुरेश कोळंबे, श्री चोलदास पाटील व इतर सर्व ठेकेदार उपस्थित होते





