मोटार सायकल ढकलत नेऊन इंधन दरवाढीचा पंढरपूरात निषेध
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबूब भाई शेख प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष रविकांत वरपे ,सुरज चव्हाण,यांचे आदेशानुसार राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचे नेतृत्वाखाली आज पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सर्व सेलच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन ते प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मोटारसायकल चालवत नेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येवून प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या या इंधन व गॕस दरवाढीच्या निर्णया विरोधात संताप व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली.या वेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील युवती जिल्हाध्यक्षा युवती श्रेया भोसले पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले जेष्ठ नेते सुभाष भोसले,जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,अरुण आसबे,युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा युवक सचिव सुरज पेंडाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गिरीश चाकोते, सचिन कदम,दादा थिटे,,सुरज गंगेकर ,निलेश कोरके, राकेश साळुंखे, शुभम साळुंखे सागर पडगळ ,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रशीद शेख,अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब शेख ओंकार चव्हाण, सारंग महामुनी,पंढरपूर महिला तालुकाध्यक्ष अनिता पवार,शहराध्यक्ष संगीता माने,युवती प्रदेश संघटक चारुशिला कुलकर्णी ,तालुकाध्यक्ष कीर्ती मोरे,राधा मलपे ओबीसी जिल्हाअध्यक्ष साधनाताई, राऊत, कांचन खंडागळे ,राष्ट्रवादी विद्यार्थी शहर उपाध्यक्ष शुभम साळूखे ,पंढरपूर शहर सरचिटणीस ओंकार शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






