Pune

जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल्ल समाजाचे नंदुरबार जात पडताळणी समिती विरोधात पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या 3 ऱ्या दिवशीं यश उपोषणार्थीत सात मध्ये एका महिलेचा समावेश

जळगांव जिल्ह्यातील तडवी  भिल्ल समाजाचे नंदुरबार जात पडताळणी समिती विरोधात  पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या  आमरण उपोषणाच्या 3 ऱ्या दिवशीं  यश…
उपोषणार्थीत  सात मध्ये  एका  महिलेचा  समावेश 

जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल्ल समाजाचे नंदुरबार जात पडताळणी समिती विरोधात पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या 3 ऱ्या दिवशीं यश उपोषणार्थीत सात मध्ये एका महिलेचा समावेश

प्रतिनिधी मुबारक तडवी 
  गेल्या तीन ते चार वर्षांपासूनजळगांव जिल्ह्यातील  आदिवासी तडवी भिल्ल समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्यात नंदुरबार समिती मज्जाव करीत आहे, तडवी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने वारंवार नंदुरबार समिती व पुणे टि-आर-टि-आय ला निवेदनांद्वारे पत्रव्यवहार करून हि समाजावर अन्याय होत आहे… खऱ्या आदिवासी तडवी भिल्ल जमातीतीला न्याय-हक्कापासूंन मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न होत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गरीब आदिवासी समाजाची स्थिती अत्यंत दयनीय असून यांना  शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी  समितीच्या मा. बबीता गिरी हे पुर्वग्रहदुषीत दृष्टिकोनातून समाजाचा नुकसान करत गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक तसेच नौकरी वर लागलेल्या काही युवकांना ०८ नंबर(तडवी-भिल्ल) जातवैधता प्रमाणपत्र देत नाहीये… त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना आपले शिक्षण मध्येच सोडावं लागले व ज्या युवकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर नौकरीस लागले होते त्यांना जातवैधता प्रमाणपत्र अभावी नौकरी सोडावी लागली आहे. त्रस्त आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा शेवटी “आमरण” चा विधान वापवावं लागत आहे. जो पर्यंत आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल्ल समाज पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आवारात “आमरण उपोषण” करतील “मृत्यू शी झुंज झाली तरी चालेल पण आपल्या अस्तित्वासाठी आम्ही लढणारंच” असा ठाम निर्धार समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या आमरण उपोषणाला उद्या दिनांक २९ आॅगष्ट पासून सुरूवात झाली जोपर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत व जमातीला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणा सुरूच राहणार.उपोषण च्या  3 दिवसी आयुक्तांनी मागण्या  मान्य  करीत  लेखी पत्र  उपोषनार्थीना दिले 
आमरण उपोषणाचे कारणे:-
१)अ.क्र. ८ नंबर चे प्रमाणपत्र नाकारून अ.क्र. १३ चे प्रमाणपत्र देण्यास सक्ती करण्यात येत आहे.
२) आदिवासी तडवी भिल्ल जमातीचा संवैधानिक हक्क व अधिकार हिरावण्याचा प्रयत्न केला केला जात आहे.
३) पेसा क्षेत्रातील उमेदवारांची जात प्रमाणपत्र प्रकरणे रद्द करण्यात आले व काही प्रलंबित ठेवण्यात आले आहे.
४) शैक्षणिक व नौकरी बाबतचे प्रकरणे सरसकट सर्वांना एकच कारण दाखवून रद्द करण्यात आले व काही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थी व नौकरीतील युवकांचे नुकसान होत आहे.
५) जळगाव जिल्ह्यातील सर्व तडवी भिल्ल जमातीला ०८ ऐवजी १३ चे जात-प्रमाणपत्र (कास्ट) ची सक्ती करून फार्म नमूना “C” नुसार अर्ज करण्यास सक्ती केली जात आहे.
या होत्या प्रमुख मागण्या:-
१) दिनांक ०६/०९/१९५० रोजी अनु. जमातीची पहिली यादी मा. राष्ट्रपतींनी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसारच “तडवी भिल्ल” जमातीला अ.क्र. ८ नुसारच जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.
२) ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यांना त्वरीत जातवैधता प्रमाणपत्र मिळावे व विनाअट प्रवेश मिळावा.
३) तडवी भिल्ल जमातीचे शैक्षणिक व नौकरी संदर्भातील प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेले आहेत त्यां प्रकरणांची तात्काळ सुनावणी करून लवकरात लवकर न्याय द्यावा.
४) विहीत मुदतीत वैधता प्रमाणपत्र पारीत करण्यात यावे.
५) विविध प्रकरणांत नंदुरबार समितीला न्यायालयाने दंड ठोठावला आहे व उपाध्यक्षांवर गुन्हा नोंद झालेला आहे यांची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
६) जळगाव जिल्ह्यातील तडवी भिल्ल जमातीत शासन अध्यादेशानुसार फार्म “B” नुसारच जात प्रमाणपत्र देण्यात यावे.
          वरील कारणे व मागण्या आदिवासी तडवी भिल्ल समाज पुणे येथे आमरण उपोषणाठिकाणी मांडल्या आदिवासी तडवी भिल्ल समन्वय समिती सह  सर्वआदिवासी  जमातीच्या उपोषणा ठिकाणी आपले न्याय हक्कासाठी संविधानिक न्यायीक लढ्यात सतत् 3दिवस  सुरु राहिलेल्या या आमरण उपोषणास  यश मिळाले  आदिवासी तडवी  भिल्ल  समन्वय  समितीस TRTI  च्या आयुक्त यांनी  मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र उपोषणर्थी णा देऊन उपोषण सोडविले

जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल्ल समाजाचे नंदुरबार जात पडताळणी समिती विरोधात पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या 3 ऱ्या दिवशीं यश उपोषणार्थीत सात मध्ये एका महिलेचा समावेश
 उपोषणार्थी  नासेरखा अकबर तडवी 
कादर तडवी  संजू  रमजान  तडवी 
मुबारक अलीखा तडवी, मुराद  तडवी, तसलीम तडवी,व  महिला उपोषणार्थी  सकीना तडवी यांनी सलग 3 दिवस उपोषण केलं तर    समाजातील ऍड. याकूब  तडवी, अनिल तडवी, मर्जीत हमीद, एम. बी सर, राजू  हुसेन,मिरखा  तडवी लूखमांन सर, मनोज  तडवी  तडवी  भिल्ल  महिला  मंडळ मुंबई ,पुणे  नाशिक,, जळगांव,येथील  तडवी  भिल्ल  समाज अधिकारी,, नोकरदार व  समाज  बांधव  बुलढाणा,, औरंगाबाद, सह महाराष्ट्र तील सर्व  आदिवासी संघटना चे  पुरुष महिला प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व  तडवी भिल्ल समाज बांधव  पुणे येथील TRTI   कार्यालयासमोर ठिय्या मांडत संविधानिक मार्गाने  शांततेत उपोषण केले आदिवासी आयुक्त  यांनी  उपोषण कर्त्यांना  लेखी  पत्र देत  सर्व मागण्या  मान्य केल्यानंतर उपोषण  सोडण्यात आले

जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल्ल समाजाचे नंदुरबार जात पडताळणी समिती विरोधात पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था समोर सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या 3 ऱ्या दिवशीं यश उपोषणार्थीत सात मध्ये एका महिलेचा समावेश

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button