Pandharpur

अनोळखी व्यक्तींशी सोशल मिडीयावरुन संपर्क टाळा -उपविभागीय पोलीस अधिकारी -डॉ.सागर कवडे

अनोळखी व्यक्तींशी सोशल मिडीयावरुन संपर्क टाळा -उपविभागीय पोलीस अधिकारी -डॉ.सागर कवडे

प्रतिनिधि (रफिक आतार)

पंढरपूर-इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली आर्थिक फसवणूक व लैगिंक छळवणूक या सारखे प्रकार घडतात ते टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
‘सायबर सेफ वुमेन’ मोहिमेतंर्गत सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी फसवणूक, त्याचे प्रकार व वापर करताना घ्यावयाची दक्षता आदींबाबत सायबर पोलीस दल व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्या वतीने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास तालुका पोलीस निरिक्षक किरण अवचर, सायबर क्राईमचे सहा.पोलीस पिरिक्षक रविंद्र गायकवाड, सहा.पोलीस निरिक्षक खान, नगरसेवक डी.राज सर्वगोड, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोकराव भोईटे, प्रा.डॉ.लतिका बागल, प्रा.डॉ.फैमिजा विजापुरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे बोलताना म्हणाले, सोशल मिडीया वापर करताना आपली वैयक्तिक व खासगी बाबतची माहिती आवश्यकता नसेल तर शेअर करु नयेत. सोशल मिडीयाच्या बाबतीत सतत सजगता हाच सुरक्षेचा उपाय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिला व विद्यार्थ्यांनी कोणतेही व्यक्ती छेडछाड करीत असेल तर त्याबाबतची माहिती निर्भया पथकाला अथवा पोलीस स्टेशन तक्रार दाखल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सायबर सेलचे सहा.पोलीस निरिक्षक रवींद्र गायकवाड यांनी इंटरनेट बॅकिंग, सायबर गुन्ह्यांचे प्रकारामध्ये सायबर ग्रुमिंग, सायबर बुलिंग, फिशिंग, ऑनलाईन गेमिंग, सेक्सॉर्टशन, स्कुटींग, नोकरी बाबतचे प्रलोभने अशा विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. ब्ल्यु व्हेल, पब्जी सारख्या इंटरनेट गेमिंगच्य आहारी गेल्यामुळे अनेक तरुणाचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सोशल मिडीयावर कुठलीही अक्षेपार्ह बाब लक्षात येताच तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही सायबर सेलचे सहा.पोलीस निरिक्षक गायकवाड यांनी यावेळी
प्रारंभी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सायबर सुरेक्षाबाबत आवाहनाचा संदेश प्रसारित करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोकराव भोईटे यांनी समाज माध्यमांबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.फैमिजा विजापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.लतिका बागल यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button