Indapur

सोलापूर जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांवर मोठा अन्याय आहे. शिवसेनेचे मा.आ.नारायण पाटील यांची उपरोधिक प्रतिक्रिया

सोलापूर जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांवर मोठा अन्याय आहे. शिवसेनेचे मा.आ.नारायण पाटील यांची उपरोधिक प्रतिक्रिया

दत्ता पारेकर

इंदापूर : माजी मंत्री तानाजी सावंत हे शिवसेनेतील फार मोठे नेते आहेत. त्यांना मंत्रीमंडळातून कसं काय डावललं ? अशी उपरोधिक प्रतिक्रिया शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी आमदार नारायण पाटील व भुम- परांड्याचे सुरेश कांबळे यांची उमेदवारी कापण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. त्यावर अपक्ष लढून नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या रश्मी बागल यांच्यापेक्षा 25 हजार मते जास्त मिळवली. तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांची उमेदवारी कापणे चुकीचे होते, हे निकालानंतर स्पष्ट झाले.

आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना डावलण्यात आल्यानंतर नारायण पाटील म्हणाले मी शिवसेनेचा आमदार म्हणून पाच वर्ष प्रमाणिकपणे काम केले तरीही मला डावलण्यात आले. हे सर्व कुणी केले, हे संपुर्ण जिल्ह्यातील नव्हे राज्यातील शिवसैनिक सांगत आहेत. आज मी जर आमदार असतो सावंत यांना मंत्री करण्यासाठी पक्षप्रमुखांना विनंती केली असती.

भगवान के देर है अंधेर नही..

मंत्रीमंडळाच्या यादीतून तानाजी सावंत यांना वगळण्यात आल्याचे समजताच जैसी करणी, वैसी भरणी, भगवान के घर में देर हे लेकिन अंधेर नही असे मेसेज सोशल मिडीयातून फिरत आहेत. व हिच चर्चा प्रत्येक गावात रंगली आहे. तानाजी सावंत यांनी उमेदवारी दिलेले दिलीप माने (शहर-मध्य सोलापूर), रश्मी बागल (करमाळा), दिलीप सोपल (बार्शी), नागनाथ श्रीरसागर (मोहोळ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button