Chimur

कॉरंटाइन झालेल्या माजी विद्यार्थिनी केली “ माझी शाळा स्वच्छ”

कॉरंटाइन झालेल्या माजी विद्यार्थिनी केली “ माझी शाळा स्वच्छ”

चिमूर प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके

शंकरपूर येथून जवळ असलेल्या हिरापूर येथे जी. प. शाळेत कॉरंटाइन असलेल्या तरूंणानी गावच्या जी.प शाळेचा परिसर स्वच्छ करून आदर्श निर्माण केला
कोरोनाचा संक्रमण रोकण्यासाठी २2 मार्च ला देशव्यापी लाकडाऊन सुरु झाला. बाहेर जिल्हा व राज्यात अडकलेल्या लोकांसाठी स्वगृही परत येण्यचा मार्ग शासनाने मोकळा केल्यानंतर रोजी रोटी साठी पुणे, नागपूर व इतरत्र कंपनीत काम करन्यासाठी गेलेले बारा तरुण स्वगृही हीरापूर येथे परत आले त्यांना कोविड १९ च्या नियमानुसार त्यांचा स्वगावी जी. प. शाळेत कॉरंटाइन करण्यात आले. लाकडाऊन पासून शाळा बंद असल्याने परिसरात खूप मोठ्या प्रमाणत गवत व कचरा जमा झाला होता व शाळेच्या परिसरातील झाडे सुद्धा पाण्या -अभावी सुकत चालली होती. दिवस भर रिकामे बसून काय करणार असा प्रश्न त्याचा समोर त्यामुळे घरून पावडे व बकेट मागून दररोज सकाळी शाळेचा परिसर स्वच्छ करणे सुरु करून सायंकाळी झाडाला पाणी देण्याचे काम सुरु करून इतरांच्या समोर आदर्श निर्माण केला.

आम्ही सर्व कॉरंटाइन झालेलें तरुण याच जी. प. शाळेत वर्ग एक ते वर्ग सात पर्यत शिक्षण घेतले. पोटा पाण्यासाठी बाहेर गावी जावे लागले. कोरोनचे संक्रमन रोखण्यासाठी आम्हाला कॉरंटाइन व्हावे लागले. ज्या शाळेत आम्ही शिकून लहानाचे मोठे झाले त्याच शाळेत या निमित्ताने १४ दिवस राहण्यiचा योग आला परंतु इथे आल्यावर खूप दिवसापासून शाळा बंद असल्याने परिसरातील झाडे सुद्धा पाण्या अभावी सुकत चालली होती. म्हणून आम्ही सर्वांनी “माझी शाळा म्हणून” वेळेचा सदउपयोग करून व आपले कर्तव्य समजून घरून पावडे व बकेट मागून दररोज सकाळी शाळेचा परिसर स्वच्छ करणे सुरु करून सायंकाळी झाडाला पाणी देण्याचे काम सुरु केले, या निमित्याने शाळेचा ऋण फेडण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button