Ausa

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपसे चिंचोली येथे शिवजयंती साजरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपसे चिंचोली येथे शिवजयंती साजरी

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

औसा:- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातुन सादर केला. शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी म्हणून शाळेच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात प्रामुख्याने चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपसे चिंचोली येथे शिवजयंती साजरीयावेळी शाळेतील सहशिक्षक प्रदीप इज्जपवार, सिद्धेश्वर आयरेकर, अशोक पवार,विलास चव्हाण,धर्मराज भिसे, सेविका स्वाती बिराजदार तसेच गावातील प्रशांत कुलकर्णी,बिबीशन गरड,किसन निकम, मुन्ना गरड तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button