Amalner

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासत मा.आ.साहेबराव पाटील यांनी कृषी कृतज्ञता कोषास देणगी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासत मा.आ.साहेबराव पाटील यांनी कृषी कृतज्ञता कोषास देणगी
अमळनेर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासत मा.आ.साहेबराव पाटील यांनी कृषी कृतज्ञता कोषास बळीराजाला हातभारासाठी २१ हजार रूपये देणगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेलफेअर ट्रस्टला सुपुर्द केले आहेत.
खा.शरदचंद्र पवार यांचा आज दि.१२डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस होता. खा.पवार यांचा वाढदिवस अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त बळीराजाला समर्पित करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील केले होते. त्यानिमीत्त “कृषी कृतज्ञता कोषा”साठी बळीराजाला हातभार योजनेअंतर्गत मा.आ.साहेबराव पाटील यांनी
रुपये-२१०००/- चा डिमांड ड्राफ्ट “राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई” या खात्यावर दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button