Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे यशस्वी आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे यशस्वी आयोजन

सलीम पिंजारी

फैजपूर – धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर च्या क्रीडा विभागाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, जिमखाना समिती चेरमन डॉ.सतीश चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका वंदना बोरोले, प्रा. शिवाजी मगर आणि डॉ.गोविंद मारतळे ,डॉ. जी जी कोल्हे व राजेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा.शिवाजी मगर यांनी मांडले.

कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर.चौधरी सर यांनी विध्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. महामारीच्या संकटातून बाहेर येण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे आणि ते खेळाच्या माध्यमातून आपण ते सहज प्राप्त करू शकतो त्याकरिता प्रत्येकाने खेळात सहभाग घेतला पाहिजे असे सांगितले. खेळ हे मनुष्याची सहज प्रवर्ति आहे आणि ती प्रत्येकानी जोपासली पाहिजे. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य यांनी खेळ हे मनुष्य जीवन जगण्याचे प्रमुख साधन आहे, खेळाच्या माध्यमातून सहज रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात असे सांगितले. त्याकरिता जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी खेळात सहभाग घ्यावा असे महाविद्यालयाच्या वतीने आव्हान केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना समितीचे चेरमन डॉ.सतीश चौधरी यांनी आजच्या दिवसाचे महत्व विशद करून ऑनलाइन होणाऱ्या प्रश्न मंजुषेत जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे क्रीडा विभागाच्या वतीने सर्वाना सांगितले. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी डॉ.सतीश चौधरी, डॉ.गोविंद मारतळे, प्रा. वंदना बोरोले, प्रा. शिवाजी मगर, आर डी ठाकूर, शेखर महाजन, चेतन इंगळे, कैलास मेढे इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button