Paranda

परंडा महसुल विभागाने जप्त केलेली वाळू चोरी करताना टॅक्टर पकडला. संचार बंदी काळातही परंडा तालुक्यात वाळू चोरी सुरूच कडक कारवाई गरज

परंडा महसुल विभागाने जप्त केलेली वाळू चोरी करताना टॅक्टर पकडला.

संचार बंदी काळातही परंडा तालुक्यात वाळू चोरी सुरूच कडक कारवाई गरज

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि. २४

परंडा तालुक्यातील रुई , दुधी येथिल उल्फा नदी परिससरात परंडा महसुल विभागाने जप्त केलेल्या वाळू साठयातुन वाळूची चोरी करून वाहतुक करीत असताना दुधी येथील लिमकर यांचा वाळू ने भरलेला टॅक्टर अवैध वाळू उत्खन विभागाच्या पथकाने दि २२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पकडला असुन वाळूची चोरी करून अवैध वाहतुक करणाऱ्या टॅक्टर चा पंचनामा करून टॅक्टर पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे .

महसुल विभागाच्या जप्त केलेल्या वाळू साठयावरच डल्ला ? अवैद्य वाळू वाहतुक रोखन्या प्रकरणी पोलिस पाटील यांच्यावर जबाबदारी असताना पोलिस पाटील या कडे दुर्लक्ष करतातच कसे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे पोलीस पाटलावर,सरपंच, यांच्यावर देखील कार्यवाही होणे गरजेचे आहे . वाळू माफिया च्या विरोधात महसुल विभाग काय कारवाई करते या कडे नागरीकांचे लक्ष लागले आहे .

अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करणाऱ्या वाळू माफीया वर कारवाई करण्या साठी गेलेल्या तत्कालीन तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या अंगावर दि १४ डिसेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास टॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफीयांनी केला होता या घटने नंतर अनेक वाळू माफीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते .
मात्र काही दिवसातच पुन्हा वाळू ची अवैद्य उत्खनन व चोरटी वाहतुक सुरू झाली आहे .

महसुल विभागाने अवैद्य वाळू उत्खनन व चोरटी वाहतुक विरोधात धडक मोहिम राबऊन सबंधीतावर कडक कारवाई करावी अशी मागणी होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button