Maharashtra

पडझड झालेल्या घरांचे आ चौधरींच्या सुचनेमुळे झाले तात्काळ पंचनामे पांझरा काठावरील पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी

पडझड झालेल्या घरांचे आ चौधरींच्या सुचनेमुळे झाले तात्काळ पंचनामे
पांझरा काठावरील पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी

पडझड झालेल्या घरांचे आ चौधरींच्या सुचनेमुळे झाले तात्काळ पंचनामे पांझरा काठावरील पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी

अमळनेर
तालुक्यात झालेल्या संततधार मुसळधार पावसाने शहरातील भोईवाड़ा परीसरातील अनेक घराची पडझड झाल्याने आ शिरीष चौधरी यांनी पावसातच तातडीने घटनास्थळ गाठून पीडित कुटुंबियांना दिलासा देत अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.तसेच पांझरा काठावरील पूरग्रस्त गावांना भेट करून ग्रामस्थांना धीर दिला.

पडझड झालेल्या घरांचे आ चौधरींच्या सुचनेमुळे झाले तात्काळ पंचनामे पांझरा काठावरील पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी
            भोईवाडा भागातील सदानंद भोई, विठ्ठल भोई, गयभू भोई, जवाहरलाल भोई, बाळू भोई आदीपैकी काहींचे घर कोसळले तर काहींची भित पडल्याने मोठे नुकसान झाले आहे, या अगोदरही देखील शहरात काही घरे कोसळून प्रचंड नुकसान झाले असल्याने आमदारांनी नुकसान ग्रस्त घरांची पाहणी करून महसूल विभागाला त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेत,यामुळे महसूल कर्मचारी तात्काळ दाखल झाले होते, यावेळी आमदार शिरीष चौधरी, गटनेते प्रवीण पाठक, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, बाळासाहेब सदांनशिव, सरपंच काशीनाथ महाजन, पंकज चौधरी, संतोष चौधरी, किरण गोसावी, हिरामण पाटील, राजेंद्र पाटील,  रमेश पाटील,मनोज शिंगाने व परिसरातील नागरिक उपस्थित होते, संबंधित अधिकाऱ्यांनी लागलीच पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली होती.दरम्यान पांझरा नदीस महापूर आल्याने काठावरील मुडी परिसरातील गावांनाही आ.चौधरींनी भेट दिली,मुडी गावात पाणी घुसून गुडघाभर पाणी असताना त्याही परिस्थितीत आमदारांनी त्यांच्या चालकास गाडी काढायला लावून जनतेप्रती आस्था दाखवली.
पाझरा नदीचा पूर कमी व्हावा, व जीवित व वित्त हानी होऊ नयेत यासाठी पाझरा नदीला साडी चोळीचा आहेर देऊन जलपूजन करण्यात आले, गावात ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा करून धीर दिला व प्रशासनास काही सूचनाही केल्यात.यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button