Amalner

?️अमळनेर कट्टा…धार रोड वर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड…3 लाखांपेक्षा अधिक रु चा मुद्देमाल जप्त..

?️अमळनेर कट्टा…धार रोड वर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड…3 लाखांपेक्षा अधिक रु चा मुद्देमाल जप्त..
अमळनेर येथे धार रोडवर सट्टा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना मिळाली यावरून अमळनेर ते धार रोड वरील बल्ल्या हनुमान टेकडी जवळील टेकडीच्या जवळ आज दिनांक 26 /5/2021 रोजी 4 वाजून 30 वाजेच्या सुमारास 08 इसम झंना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळताना आढळून आले. या धाडीत रोख रुपये व 7 मोटार सायकल असा एकूण 3,07,140 रुपयाचा मुद्देमाल सह मिळून आले. पो का भूषण शिवाजी बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्याद वरून महा.राज्य जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई श्री जयपाल हिरे ,पोलीस निरीक्षक ,पोहेका किशोर पाटील,पोना हितेश चिंचोरे, भूषण बाविस्कर ,राहुल पाटील करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button