Pandharpur

केंद्र सरकारने पेट्रोलवर अतिरिक्त चार रू.लावलेला अधिभार काढून तो दारूवर लावावा – शरद कोळी याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कडे केली लेखी निवेदनाद्वारेमागणी

केंद्र सरकारने पेट्रोलवर अतिरिक्त चार रू.लावलेला अधिभार काढून तो दारूवर लावावा – शरद कोळी
याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कडे केली लेखी निवेदनाद्वारेमागणी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर काल केंद्र सरकारने 2021 – 22 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसंदेमध्ये सादर केला या अर्थसंकल्पात देशातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रामुख्याने लक्ष लागून राहिले होते ते पेट्रोलचे दर स्थिर राहणार – वाढणार की कमी होणार याकडे परंतु नागरिकांना या पट्रोल दराच्या बाबतीत काही दिलासा तर मिळालाच नाही उलट पेट्रोलवर अतिरिक्त चार रूपयांचा या अर्थसंकल्पात अधिभार लावण्यात आला तो नागरिकांच्या खिश्याला न परवडणारा आहे.
अगोदरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून अनेक नागरिकांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे तर अनेक जनांना बेरोजगार व्हावे लागले असल्याने याआधिच नागरिक विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीत असताना रोजच्या वापरात अल्मात असलेल्या पेट्रोलचे दर सध्याच 95 ते 96 रूपये असताना त्यावर येत्या काही दिवसांमध्ये आणखी चार रूपयांचा जो अतिरिक्त अधिभार केंद्र सरकारने चुकीच्या पध्दतीने व जन भावना लक्षात न घेता घेतलेला एकतर्फी निर्णय असुन ही स्पष्ट पणे नागरीकांची सरकार फसवनूक करत आहे.
हा निर्णय केंद्र सरकारने जन भावना लक्षात घेऊन लवकरात – लवकर मागे घ्यावा अन्यथा काॅग्रेस सरकारला ज्या पध्दतीने जनतेने त्यावेळी पेट्रोल दर वाढीच्याच मुद्दावरून सत्तेवरून हटवले त्याच पध्दतीचा अवलंब करण्यास जनतेला आपण भाग पाडू नये असे मत धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी लेखी निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे. व केंद्र सरकारला ही आर्थिक महसुलची गरज असते तेही तितकेच खरे आहे तर त्यासाठी पेट्रोल वरील लावलेला अतिरिक्त चार रूपयांचा अधिभार काढून तो सरकारने दारू वरती लावावा असे ही शरद कोळी यांनी सदर लेखी निवेदनामध्ये नमूद केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलवर अतिरिक्त चार रू.लावलेला अधिभार काढून तो दारूवर लावावा - शरद कोळी याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कडे केली लेखी निवेदनाद्वारेमागणी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button