कळंब शहरात अवैध धंद्याला उत
बसस्थानकातील पोलीस मदत केंद्राकडे पोलिसांची पाठ, ऐन दिवाळीच्या सणात ही मदत केंद्र कुलूप बंद! पोलीस मदत केंद्र नावापुरतेच ?
सलमान मुल्ला उस्मानाबाद
Usamanabad : कळंब शहरात अवैध धंद्याला ऊत आला आहे. ठिकठिकाणी मटका अड्ड,पत्त्यांचे क्लब,सुरट, चक्री, गांजाविक्री आदी रोजरासपणे चालू आहेत. असे असताना देखील पोलीस प्रशासन मात्र ढीम्म आहे.अशाप्रकारे कळंबचे हे चित्र कधी बदलणार याविषयी उलट सुलट चर्चा कळंबच्या नागरिकांमध्ये सुरूच यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई मात्र होताना दिसत नाही .
कळंब बस स्थानकात दिवाळीच्या सणात चक्क पोलिसांचे मदत केंद्र कुलूप बंद असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कळबं बस स्थानकावर आठवडी बाजार असो या दिवाळीचा सण असो पाकीटमार ,मोटार सायकल चोर किंवा बॅगा पळवणारी टोळी मोबाईल चोर यांचा सक्रिय वावर असल्याने पोलिसांनी आठवडी बाजारा दिवशी तसेच ऐन दिवाळीच्या सणात बसस्थानकातील पोलीस मदत केंद्र कुलूपबंद ठेवून चक्क पाठ फिरवली आहे यामुळे प्रवासातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कळबं बस स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत आहे त्यातच दिवाळीचा सण संपून प्रवासी आपल्या मूळ ठिकाणाकडे जाण्यास सुरुवात झाल्याने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या गर्दीचा फायदा भुरटे चोर पाकीटमार मंगळसूत्र चोर मोबाईल चोर अशा अनेक टोळ्या सक्रीय झाले आहे, या काळामध्ये अनेकांचे मोबाईल, पैसे ,दागिने चोरीला गेले ली चर्चा आहे. पण पोलिसात याबाबत कुठलीही दाद ना फिर्याद असे म्हणण्याची वेळ आली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस स्थानकात दोन पोलिसांची नेमणूक सण व आठवडे बाजार या दिवशी पोलिसांच्या दिवट्या लावल्या जातात पण मागील काही दिवसापासून बस स्थानकावर ती एकही पोलीस दिसत नसल्याने प्रवाशांतून तीव्र संताप होत आहे त्यांच्या निवाऱ्यासाठी नगरपरिषदेने एक मोठे शेड बांधून दिले आहे. पण ते नेहमी कुलूप बंद असल्याने नागरिकांना कुठे मदत मागावी हा प्रश्न सतत भेडसावत आहे यामुळे अशा कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ वरिष्ठांनी उचलबांगडी करावी अशी मागणी जोर धरत आहे.






