बारामती बऱ्हाणपूर येथे उभारणार पोलीस उपमुख्यालय
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – जेव्हा जेव्हा पवार कुटुंबिय सत्तेत सहभागी असतात,त्या सत्तेचा फायदा बारामतीला नेहमीच होतो. मग पाणी वाटपाचा प्रश्न असो की,उद्योगाचा मंजुरीच्या मागील पाच वर्षात भाजपच्या काळात बऱ्हाणपूर पोलीस उपमुख्यालायचा प्रश्न तसाच रेंगाळला.परिणामी येथे वाढलेले जमिनीचे भावही पुन्हा घसरले.मात्र आज राज्य सरकारने या पोलीस उपमुख्यालय विषयाचे दरवाजे उघडले आणि उपमुख्यालयचा प्रश्न मार्गी लागला.
बऱ्हाणपूर पोलीस उपमुख्यालयचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने जारी केला.बारामती तालुक्यात राजकिय, शैक्षणिक, औद्योगीक व इतर कारणामुळे कायदा व सुव्यवस्थाच्या दुष्टीने पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याचे आज गृह विभागाने जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीकरांच्या सत्काराला उत्तर देताना फक्त कामावरच आपला भर राहील आणि थोडे थांबा,सगळी कामे मार्गी लागतील असे जे काही आश्वास्त केले होते.त्याचे दृष्य परिणाम आता दिसू लागले आहेत.बारामतीत आल्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून विकासकामांचा पाहणीत रमणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचा कारभार हाकताना आपल्या मतदारसंघातीळ प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे रात्रीचा दिवस करीत आहेत.






