भगीरथ भालके यांच्या प्रचाराची रणनीती तयार
सेनेच्या पदाधिकारी सोबत बैठक संपन्न
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : आज शुक्रवार दि 2 एफ्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची रणनीती तयार केली असून, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सुचनेनुसार तथा शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार मा. भगीरथ ( दादा ) भारतनाना भालके यांच्या बरोबर समन्वय बैठक संपन्न झाली.
यावेळी शिवसेना पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख . संभाजीराजे शिंदे,भैरवनाथ शुगर चे
व्हा.चेअरमन .अनिलदादा सावंत,पंढरपुर तालुका प्रमुख . महावीर नाना देशमुख, पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे, शिवसेना पंढरपुर मंगळवेढा विधानसभा समन्वयक संजय घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.






