Amalner

? Breaking..मालपूर मार्गे सर्रास वाळू उपसा.. कोतवालच्या संगनमताने होतेय अवैध वाळू वाहतूक..! प्रशासन करणार का कार्यवाही..!

मालपूर मार्गे सर्रास वाळू उपसा.. कोतवालच्या संगनमताने होतेय अवैध वाळू वाहतूक..! प्रशासन करणार का कार्यवाही..!

रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील बोरी नदीपात्रातुन मालपूर मार्गे सर्रास वाळू वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाचा माणूस दाखवत आहे वाळू चोरट्यांना रस्ता..
अमळनेर तालुक्यातील रंजाने- अंतुर्ली बोरी नदीपात्रातुन ट्रॅक्टर व लहान अप्पे गाड्या द्वारे हा वाळू उपसा रात्रंदिवस सुरूच असतो या बाबत वाळू चोरट्यांना कोणाचे भय नाही कारण गावातील कोतवाल सोमनाथ पाटील यांच्या संगनमताने हा उपसा सुरू आहे. या बाबत ची तक्रार अमळनेर मनसे तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केली आहे.तसेच मिलिंद पाटील यांनी तहसीलदार वाघ यांना फोन करून हा विषय सांगितला आहे. तरी याबाबत कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा मनसे चे मिलिंद पाटील यांनी ठोस प्रहार शी बोलतांना सांगितले आहे.
या बाबत ची तक्रार मनसे चे मिलिंद पाटील यांनी ठोस प्रहार कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button