Dhule

पी एम किसान योजनेला ‘आधार’चा खोडा.” ‘जिल्ह्यातील लाखाच्या आसपास शेतकऱ्यांचे आधार कार्ड जुळेना…’

पी एम किसान योजनेला ‘आधार’चा खोडा.”
‘जिल्ह्यातील लाखाच्या आसपास शेतकऱ्यांचे आधार कार्ड जुळेना…’धुळे नंदुरबार : प्रतिनिधी / महेंद्र खोडेप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देण्याची योजना अंमलात आली असून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असली तरी जिल्ह्यातील 82 ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्यानव (82,794) शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे आधारकार्ड fealure आढळून आल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या आधार व इतर चुकीच्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याच्या कामाला सद्या वेग आला आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दोन दोन हजार याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये देण्याची ही योजना असून हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याने त्यासाठी नोंदणी करतांना लाभार्थी शेतकऱ्यांचे आधारकार्ड,बँक खाते व आयएफसी कोड आवश्यक असल्याने अनेक लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या चुकांमुळे हा निधी वेळेवर पोहचला नसल्याचे निदर्शनास आले आहे.एकट्या धुळे जिल्ह्यात ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्यानव (82,794) शेतकरी लाभार्थ्यांच्या आधारकार्ड नंबर,बँक खाते नंबर व आयएफसी कोडमध्ये चुका आढळून आल्याने हा निधी वितरित करण्यास त्यांना अडचणीचे ठरू नये यासाठी प्रशासनाकडून यासाठी तहसील कार्यालयात चुकीच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी आपले आधारकार्ड व बँक पासबुक नेवून ऑनलाइन प्रक्रियेतून दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.”नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ताही हातात पडला नाही.”
अनेक शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून ऑनलाइन प्रक्रियेतून पीएम किसान योजनेसाठी नोंदणी झाली असून पोर्टलवर चेक केले तर नोंदणी पूर्ण दाखविते मात्र अशा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हा निधी जमाच झाला नसल्याने लाभार्थी तलाठी व तहसील कार्यालयावर चकरा मारून आमचा पहिला हप्ताही का जमा झाला नाही असे शेतकरी विचारत असतांना हा निधी थेट केंद्राकडून बँक खात्यात जमा होत असल्याने सांगितले जात आहे.पी एम किसान योजनेला 'आधार'चा खोडा." 'जिल्ह्यातील लाखाच्या आसपास शेतकऱ्यांचे आधार कार्ड जुळेना...'जिल्ह्यातील तालुकानिहाय आधारकार्ड fealure असलेले लाभार्थी शेतकरी.तालुका आधार fealure लाभार्थी
1)शिरपूर – 12,027
2)शिदखेडा- 17,549
3)साक्री — 28,217
4)धुळे-25,001
एकुण -82,794
———————

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button