Amalner

डुकरांची वाढती संख्या,साथीचे रोग आणि शहरात डुकरांचा वावर पाहता डुक्कर मालकांना न प ची नोटीस..! 7 दिवासात डुक्कर न हलविल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार..!

डुकरांची वाढती संख्या,साथीचे रोग आणि शहरात डुकरांचा वावर पाहता डुक्कर मालकांना न प ची नोटीस..! 7 दिवासात डुक्कर न हलविल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार..!

१. श्री. ठाकुर मुनीर फतरोड,
२. श्री.नरेश कालु कल्याणे
३. श्री.आकाश संजय धाप व्दारा- भरत हरचंद धाप
४. श्री.राजेश टिल्लु जाधव व्दारा – सनी राजेश जाधव
५. श्री.किशोर वजीर जाधव व्दारा- विक्रम किशोर जाधव
६. श्री.लखन मनोज कलोसे
वरील सर्व १ ते ६ डुक्कर मालक यांना
आपणांस या नोटीसीव्दारे कळविण्यात येते की, अमळनेर शहरात मोठया प्रमाणात डुकरांची वाढ झालेली असुन व पावसाळयाचे दिवस सुरु असल्याने शहरातील १ ते १७ प्रभागात वास्तव्य असलेले नागरीकांच्या घरात शिरुन घाणीचे साम्राज्य निर्माण करीत असुन घरातील लहान मुलांना चावा घेत आहे. त्यामुळे नागरीकांच्या मोठया प्रमाणात डुकरांची विल्हेवाट लावणेबाबत तक्रारी स्वच्छता विभागात प्राप्त होत आहेत. तसेच शहरात कोरोना, स्वाईन प्ल्यु सह विविध साथीचा रोगाचा प्रादुर्भावात वाढ होवू नये याकरीता आपल्या मोकाट सोडलेल्या डुकरांमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुर्वी कार्यालयाने आपणांस इकडील
जा.क्र.वशी १२अ-३३८/२०२१ दिनांक.२४/०२/२०२१ रोजीच्या नोटीसीने आपल्या मालकीचे डुकर/ जनावरे शहर हददीत बाहेर हलविण्याची सुचना दिलेली होती. पंरतु आपण अद्याप पर्यंत डुकरे शहरा बाहेर हलविली नाही.
त्यामुळे अमळनेर नागरी क्षेत्रातील विविध भागात आपल्या मालकीचे मोकाट डुकरे आढळुन आलेली आहे. त्यामुळे शहरात त्याचे वावरामुळे दुर्गधी,रस्त्यास अडथळा निर्माण होणेसह त्यांच्या वावरामुळे साथीच्या रोगाच्या प्रादुर्भाव होणेची गंभीर शक्यता निर्माण झालेली आहे.करीता आपले मालकीचे सदरची मोकाट जनावरे डुकरे ही हया नोटीसीच्या प्राप्तीपासुन ७ दिवसाचे आता ताब्यात घेवून त्यांची विल्हेवाट लावावी. अशी जनावरे तदनंतर देखील आढळुन आलेस आपलेविरुध्द महाराष्ट्र नगरपरिषदा, न प व औद्योगिक अधिनियम-१९६५ च्या कलम २३७,२४५
व २४६, २४८ आणि कलम – २९३ व २९४, भारतीय दंड संहिताचे कलम- २६८,२६९,२७० २८९,२९०,२९१ तथा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम -४५ व ९० अ च्या तरतुदीनुसार फौजदारी पात्र कारवाई करणेकामीचा अभियोग दाखल करणेत येवून सदर जनवाराची योग्य ती विल्हेवाट लावणेत येईल, याची नोंद
घ्यावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर नोटिसच्या प्रति माहिती तथा उचीत कार्यवाहीसाठी

पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, अमळनेर जि.जळगांव
उपविभागिय अधिकारी सो, अमळनेर भाग अमळनेरम.उपविभागिय पोलीस अधिक्षक सो, अमळनेर पोलीस ठाणे, अमळनेर
म.तहसिलदार सो, अमळनेर जि.जळगांव
म. अध्यक्षा सो, अमळनेर नगरपरिषद अमळनेर यांना देखील देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button