Yawatmal

सोनखास येथे कौशल्य प्रशिक्षण आयोजित …..

सोनखास येथे कौशल्य प्रशिक्षण आयोजित

रूस्तम शेख यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ उपविभागीय कृषी अधिकारी के. एन. वानखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषि अधिकारी कुताळं मॅडम यांच्या नियोजनात यवतमाळ जिल्हयात कळंब तालुक्यातील मौजा सोनखास येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना व शेत मजुरां साठी शेती शाळा तसेच कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले .

या प्रशिक्षण मधे फवारणी पंपाची ओळख, फवारणी तंत्रज्ञान, विषबाधा होऊ नये म्हणून वापरावयाचा संरक्षण कीट, फवारणी करताना व नंतर घ्यावयाची काळजी या बद्दल कृषी सहायक श्री चंदनशिवे यांनी मार्गदर्शक केले.

सोनखास येथे कौशल्य प्रशिक्षण आयोजित .....

तसेच शेती शाळा समन्वयक रेणुका फरकाडे यांनी कीड नाशकाची ओळख, कीडनाशकाचे द्रावण तयार करणे, रस शोषण किडी, मित्र कीटक ओळख व त्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले, गुलाबी बोन्ड अळी निरीक्षणे व एकात्मिक कीड व्यवस्थापन, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच रानभाजी चे महत्व यावर शेती शाळा प्रशिक्षक शुभम फरकाडे यांच्या द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समूह सहायक सोमेश्वर ठाकरे यांच्या द्वारे प्रकल्पा मधील वेगवेगळ्या घटकांच्या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

सोनखास येथे कौशल्य प्रशिक्षण आयोजित .....

या प्रशिक्षणा करीता प्रगतिशील शेतकरी श्री दशरत राऊत सोनखास ग्रामस्थ, शेतकरी तशेच शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.या शेती शाळे दरम्यान श्री. चंदनशिवे यांचे हस्ते फवारणी संरक्षण कीट वाटप करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button